Creating Awareness About Dementia
Alzheimer’s Support Group, Pune has always emphasized awareness development about this subject. We have organised over fifty awareness programmes over the years. The programmes include lectures, exhibitions, memory testing, discussion sessions etc.
These sessions cover important aspects of dementia such as its symptoms, nature of the disease, guidance on dementia care, caring for caregivers, difference between age associated memory loss and dementia and so on.
It is our sincere hope that this effort will help early detection of dementia and improving quality of life of both caregivers and patients.
डिमेन्शियाची जनजागृती करणारा आमचा एक विशेष कार्यक्रम म्हणजे – भुली यादे हे पथनाट्य किंवा ज्याला प्रसंग नाट्यही म्हणू शकतो.
डिमेंशिया रुग्णाची काळजी घेताना कुटुंबात घडणारे चार प्रसंग आम्ही या पथनाट्यामध्ये मांडले आहेत. ते प्रसंग प्रेक्षकांना खूप भिडतात आणि या आजाराची माहिती घेण्यासाठी प्रवृत्त करतात. या पथनाट्याला जोडून डिमेंशिया आजाराची माहिती आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. एक, दीड तास चालणारा हा कार्यक्रम लोकांच्या पसंतीस पात्र ठरतो. याबद्दल आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या असतात त्याचं एक प्रतिनिधिक उदाहरण खालच्या प्रतिक्रियांमध्ये वाचू शकाल.
“कालचे तुमचे पथनाट्य खूप छान झाले.सगळ्यांचा अभिनय नैसर्गिक होता.पाठांतर चोख होते.विशेष वेषभूषा, नेपथ्य कशाचाही आधार नसताना तुम्ही विषय प्रभावीपणे मांडला. तो आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला. लेखनही जास्त फाफटपसारा न ठेवता मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणारे आहे. विषय सध्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या आजाराचा अतिशय गंभीर असूनही, हलक्या फुलक्या संवादातून त्याचे स्वरूप तुम्ही प्रेक्षकांपुढे मांडले. स्त्रियांनीच पुरुषांचे रोल करूनही बोलताना काहीच गडबड झाली नाही.
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सामाजिक जाणिवेतून हे काम करता हे फारच कौतुकास्पद आहे. तुमचे नाटकाचे असेच शेकडो प्रयोग होवोत त्यासाठी तुम्हाला चौघींना खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐”
आतापर्यंत या पथनाट्याचे 27 प्रयोग झालेले आहेत यावर्षी महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम बारामती येथे आयोजित करण्यात आला आणि त्यामध्ये आठशे प्रेक्षकांचा सहभाग होता जुलै महिन्यामध्ये या कार्यक्रमाचे तीन प्रयोग अहमदाबाद येथे झाले. आपल्यालाही हा कार्यक्रम करायचा असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा.




