
‘काळजीवाहक म्हणून घडताना‘ हे पुस्तक काळजीवाहकांना त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करते, आधार देते. त्याचबरोबर स्वतःची काळजी कशी घ्यावी हे सांगते. पंचेचाळीस लेखांमधून विविध विषयांची चर्चा करणारे हे पुस्तक सगळ्याच काळजीवाहकांना उपयुक्त आहे. उत्कृष्ट छपाई, आकर्षक मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाची किंमत रु ३०० आहे.

लोकसत्ता, चतुरंग – २०२१ मधील लेखमाला ‘स्मृति-आख्यान’ पुस्तक रूपामध्ये उपलब्ध आहे. वयपरत्वे आपली स्मरणशक्ती पहिल्यासारखी राहिली नाही असे बहुतेकांना वाटते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होताना दिसतो. आजूबाजूला विस्मरणाच्या आजाराचा सामना करत असलेली मंडळी दिसली की मनामध्ये भीती दाटून येते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत मेंदूच्या साथीशिवाय जगणे अशक्य आहे हेही पटते. त्यासाठी काहीतरी करावे असे वाटत असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे. आकर्षक छपाईमुळे वाचनाचा आनंद वाढवणार्या ह्या पुस्तकाची किंमत रु ३०० आहे.
दोन्ही पुस्तके खालील ठिकाणी उपलब्ध आहेत.
के जोशी अँड कंपनी
१७४५/२, सदाशिव पेठ
भिकारदास मारुती जवळ
पुणे ४११ ०३०
संपर्क: ९९७००६१६८३ / ९८२२०११६७४
