अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप, पुणे गेली अनेक वर्ष डिमेंशियाचे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करत आहे. आमचा अनुभव असं सांगतो की, ‘काळजीवाहकांना आधार दिला, माहिती दिली, दिशा दाखवली की ते काळजी घेण्याचं काम उत्तम करू शकतात’. याबरोबर सुरुवातीपासूनच काळजीवाहकांनी स्वतःकडे लक्ष देणे सुद्धा आवश्यक असते.
स्वतःचे आयुष्य आणि काळजी घेणे याचा समतोल साधला की काळजी घेण्याचा ताणही थोडा कमी होतो. या कार्यशाळेमध्ये मध्ये काळजीवाहकांना मार्गदर्शन करण्यात आले. केवळ डिमेंशियाचेच नाही तर इतरही काळजीवाहक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.